August 27, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील प्रकृती सोसायटीत ‘नागरिकांशी संवाद व नागरिक सुविधा केंद्रा’चे शिवम बालवडकर यांचे आयोजन..

बालेवाडी :

बालेवाडी येथील प्रकृती सोसायटी येथे नुकतेच ‘नागरिकांशी संवाद व नागरिक सुविधा केंद्रा’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमात भाजपा युवा मोर्चा, पुणे शहरचे उपाध्यक्ष शिवम बालवडकर आणि भाजपा सदस्या प्रियंका शिवम बालवडकर यांनी सोसायटीमधील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या स्थानिक समस्या जाणून घेतल्या.

 

यावेळी सोसायटीच्या रहिवाशांनी रस्ते, वाहतूक (ट्रॅफिक) आणि ड्रेनेज (पाणी व्यवस्थापन) अशा अनेक समस्या बालवडकर दाम्पत्यासमोर मांडल्या. नागरिकांनी सूचित केलेल्या या समस्यांची नोंद घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.

या संवाद सत्रासोबतच आयोजित नागरिक सुविधा केंद्राला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या केंद्राच्या माध्यमातून आधार कार्ड अपडेट, नवीन पॅनकार्ड, नवीन मतदान नोंदणी, रेशन कार्ड, मैरेज सर्टिफिकेट, भाडेकरी करार (Rental Agreement), पासपोर्ट सुविधा आणि रहिवासी दाखला यासारख्या अनेक महत्त्वाच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. या सुविधेमुळे नागरिकांना शासकीय कामकाजाशी संबंधित अनेक कामांमध्ये मोठा दिलासा मिळाला.