August 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडीतील श्री खंडेराय प्रतिष्ठानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! आप्पासाहेब बालवडकर यांना “महाराष्ट्राचे अनमोल रत्न” पुरस्कार प्रदान

बालेवाडी :

बालेवाडी येथील श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, श्री. गणपतराव (आप्पासाहेब) बालवडकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल ‘एबीपी माझा’ या नामांकित वृत्तवाहिनीकडून “महाराष्ट्राचे अनमोल रत्न” या कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारामुळे श्री खंडेराय प्रतिष्ठानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

 

आप्पासाहेब बालवडकर यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अथक परिश्रमामुळे श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्था अनेक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा गौरव झाला असून, इतरांनाही प्रेरणा मिळाली आहे.