पिरंगुट (ता. मुळशी, जि. पुणे) –
पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट या शाळेच्या इयत्ता सहावीचा विद्यार्थी कृष्णा भारती याने निगडी, पुणे येथे रविवारी पार पडलेल्या कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. त्याच्या या यशामुळे संपूर्ण शाळेत आनंदाचे वातावरण आहे. कृष्णाने या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या उत्कृष्ट तंत्र, शारीरिक कौशल्य आणि आत्मविश्वासाचे प्रभावी प्रदर्शन केले.
या यशासाठी शाळेच्या संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल व कु. शिवानी बांदल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्या सौ. आसावरी हंचाटे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात सहभागी होण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले जाते.तसेच क्रीडा शिक्षक यांचे मोलाचे योगदान आहे.माध्यमिक विभागप्रमुख पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सना इनामदार आणि पूर्वप्राथमिक विभागप्रमुख पल्लवी नारखेडे यांनी कृष्णा भारतीच्या शिस्त, आत्मविश्वास आणि कौशल्याचे विशेष कौतुक केले. कृष्णा भारती याचा सन्मान शाळेच्या वतीने करण्यात आला व त्याच्या आगामी वाटचालीसाठी सर्व शिक्षक व पालकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
More Stories
“बाप्पा मोरया! सर्जनशीलतेचा जयघोष” – पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गणेश मूर्ती वर्कशॉप
बालेवाडी येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून स्मार्ट मीटरच्या फायद्याबद्ल माहिती आणि पायाभूत सुविधांचे वेळेवर देखभाल करून वीजपुरवठा सुधारण्याचे आश्वासन
सोमेश्वरवाडी, पाषाण, सुतारवाडी, बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे या परिसरातील नागरिकांसाठी सचिन दळवी यांच्या वतीने घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन…