September 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन येथे प्री-प्रायमरी विभागात ‘ब्लू डे’ आणि ‘रेनी डे’ उत्साहात साजरे

बावधन  :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन येथे प्री-प्रायमरी विभागात ‘ब्लू डे’ आणि ‘रेनी डे’ मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी आकर्षक खेळणी व कृत्रिम जलतरण टाकीची सुंदर रचना करण्यात आली होती. पावसाचा आनंद लुटत नृत्य, गाणी आणि विविध खेळांमधून विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.

 

शाळेतील *“Learn with Fun”* या धोरणानुसार मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकवण्यावर भर दिला जातो. या कार्यक्रमानिमित्त शाळेचे संपूर्ण वातावरण निळ्या रंगाच्या आकर्षक सजावटीने सजवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना पावसाचे प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी कृत्रिम पावसाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन संस्थाध्यक्ष मा. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल व शिवानी बांदल, तसेच मुख्याध्यापिका सौ. शुभदा कोलते यांनी केले.
सर्व उपक्रमांचे संपूर्ण संयोजन प्री-प्रायमरी विभागाच्या समन्वयिका शिरीन काझी, प्रज्ञा जोशी व सायली गायकवाड यांनी अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पाडले.
सर्व शिक्षकांनी सहकार्य करत विद्यार्थ्यांना आनंददायी व संस्मरणीय अनुभव दिला.

अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये रंगांची ओळख, ऋतूंचे महत्त्व आणि सामाजिक कौशल्य यांचा विकास होत असून शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच मुलांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून शाळेची आणि शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे काम आमची पेरिविंकल शाळा करत आहे.