January 22, 2025

Samrajya Ladha

म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियम जवळ शेतकरी आठवडे बाजाराचे उद्घाटन संपन्न, नागरिकांना ताजा भाजीपाला आणि इतर शेतमाल योग्य दरात उपलब्ध होणार…

म्हाळुंगे :

म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियम जवळ माजी उपसरपंच अजिंक्य विश्वनाथ निकाळजे यांच्या विशेष प्रयत्नातून नागरिकांना ताजा भाजीपाला आणि इतर शेतमाल योग्य दरात उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी आठवडे बाजार सौ. सारिकाताई शंकरभाऊ मांडेकर, (मा.उपसभापती पंचायत समिती मुळशी) यांच्या हस्ते उद्घाटन करुण सुरु करण्यात आला.

 

शेतकरी ते थेट ग्राहक, शेतमाल विक्रीसाठी सेंद्रिय व विषमुक्त भाजीपाला, सर्व प्रकारचे फळे, धान्य, कडधान्य, मसाले, दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देणारा शेतकरी आठवडे बाजार आता नागरिकांसाठी म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियम जवळ सुरू होत आहे. २१ जानेवारी, मंगळवार पासून, दर मंगळवारी दुपारी ४ ते ६ या वेळेत हा बाजार भरवला जाणार आहे.

यावेळी श्री. विशाल भाऊ विधाते (अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्र क्र.9) ,श्री. मदन दादा पाडाळे पाटील,श्री. गुलाब भाऊ निकाळजे,श्री. हरि भाऊ निकाळजे, (माजी उपसरपंच),सौ. बेबीताई पाडाळे (पाटील), (उपसरपंच) सौ. अर्चनाताई चिव्हे, (उपसरपंच) श्री.विवेक दादा खैरे (माजी उपसरपंच,म्हाळुंगे), श्री. रणजित पाडाळे पाटील, श्री.सागर भाऊ चिव्हे, श्री. सुनील कांबळे, अध्यक्ष श्री. सचिन भाऊ निकाळजे, श्री.अविनाश लोंढे, श्री. प्रकाश वनारसे, श्री.अक्षय निकाळजे,श्री.निखिल निकाळजे यांची उपस्थिती लाभली.

You may have missed