बालेवाडी :
बालेवाडी हायस्ट्रीट येथे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका, लहू बालवडकर सोशल वेलफेअर व सनराईस मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “अटल सेवा महाआरोग्य शिबीर 2025.” चे आयोजन २४ व २५ जानेवारी २०२५ करण्यात आले आहे. नागरिकांना डायरेक्ट शिबिर स्थळी येऊन सहभागी होता येणार आहे. अगोदर नोदणी करणे बंधन कारक नाही.
शिबिराची वैशिष्टे :
१. जर्मन टेकनॉलॉजिच्या साहाय्याने ३८ आजारांवरील रुपये १५००० पर्यंतच्या रक्त चाचण्या मोफत
२. गुडघ्याची तसेच मणक्याचे उपचार बिना शस्त्रक्रिया होणार
३. गुजरात मधील प्रसिद्ध तज्ञ पन्नास डॉक्टरांच्या साह्याने प्राचीन निरो आयुर्वेदिक पद्धतीने खांदा दुखी सांधेदुखी खुबा शरीराच्या व्याधी शिबिरात कमी करणार
४. दिव्यांग व्यक्तींना मोफत इलेक्ट्रॉनिक बायसिकल
५. एम आर आय सिटीस्कॅन मोफत
६. मोफत चष्मे
७. मोफत औषध वाटप
८. कर्णबधिर व्यक्तींना मोफत श्रवण यंत्र वाटप
९. दिव्यांग व्यक्तींकरिता व्हीलचेअर, वॉकिंग स्टिक, वॉकर्स, जयपुर फुट व कॅलिपर्स चे मोफत वाटप
९. दिव्यांग व्यक्ती करिता शिबिरामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र व यु डी आय डी कार्ड वितरित करण्यात येईल
१०. सर्व आजारांवर आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया
नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून जास्तीत जास्त सुविधा या शिबिरामध्ये नागरिकांना देण्याचा आम्ही प्रयत्न केला असून या शिबिरात मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील ६० नामांकित हॉस्पिटल व तज्ज्ञ डॉक्टरचाही सहभाग आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याचे महत्त्व लक्षात घेत सर्वांसाठी मोफत असणाऱ्या या शिबिरास एकदा अवश्य भेट द्यावी
– लहू बालवडकर(चिटणीस भाजपा पुणे शहर/ आयोजक अटल सेवा महाआरोग्य शिबीर)
या शिबीराअंतर्गत विद्यार्थीं, पालक, व कर्मचारी यांच्यासाठी विविध तपासण्या आणि शस्त्रक्रिया अगदी मोफत करण्यात येणार आहेत. या शिबीराची अधिक माहिती तसेच रजिस्टेशन करण्यासाठी क्युआर कोड देखील देण्यात आला आहे. https://forms.gle/D2CzmfScRTN3zgU27 या लिंकवर नागरिकांना रजिस्टेशन करता येणार आहे. तसेच तो कोड स्कॅन केल्यानंतर शिबीराविषयी सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री. मुरलीधर मोहोळजी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. यासह राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर तसेच आमदार योगेश टिळेकर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थितीत राहणार आहे.
दिनांक: २४ व २५ जानेवारी २०२५,बालेवाडी हायस्ट्रीट ग्रांऊड, पुणे, वेळ: स. ९:३० वाजेपासून दु. ५:०० वाजेपर्यंत



More Stories
ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, सुतारवाडी बस डेपोच्या २४ मीटर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
महाळुंगे (पाडाळे) येथे “न्यू होम मिनिस्टर” कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! प्रियांका विनायक चिव्हे यांचा उपक्रम..
बालेवाडीत ‘द्वादश मल्हार दर्शन’चा भव्य अध्यात्मिक सोहळा, भारतातील १२ मार्तंड-मल्हार मंदिरांच्या पादुकांचे प्रथमच पुण्यात दर्शन.