September 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकल स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान मार्गदर्शन सत्र

पिरंगुट:

पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पिरंगुट येथे २२ जानेवारी, तर सुस व बावधन शाखेमध्ये १५ जानेवारी २०२५ रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान-I आणि विज्ञान-II विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. या व्याख्यानासाठी डॉ. सुलभा नितीन विधाते (सेवानिवृत्त प्राचार्या, शिक्षणतज्ज्ञ) यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण टिप्स व मार्गदर्शन दिले.

डॉ. सुलभा विधाते यांनी ३५ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून शिक्षक, पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून योगदान दिले आहे. त्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या “बोर्ड ऑफ स्टडीज” या समितीच्या सदस्य आहेत. तसेच त्यांनी ‘शिक्षण संक्रामण’ आणि ‘विद्यान वार्ता’ यांसारख्या शैक्षणिक नियतकालिकांसाठी लेखन केले आहे.

या मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांना विज्ञानातील संकल्पना समजावून घेण्याच्या पद्धती, परीक्षेत गुण मिळवण्यासाठी प्रभावी लेखन कौशल्य, तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित करावा याविषयी सखोल माहिती मिळाली.
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापक निर्मल पंडित यांच्या वतीने डॉ. सुलभा विधाते यांचे विशेष आभार मानण्यात आले. त्यांच्या समृद्ध अनुभवातून मिळालेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले. या सत्रामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती दूर करून देण्यात आली.

या संपूर्ण मार्गदर्शन सत्राचे आयोजन हे पेरीविंकल ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटस् चे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल , संचलिका सौ रेखा बांदल व तरूण तडफदार संचालिका शिवानी बांदल यांच्या अध्यक्षेखली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत यांच्या नियोजनाने सर्व इंचार्जेस व शिक्षकवृंद यांच्या सहयोगाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले.

 

You may have missed