बाणेर :
बाणेर येथील कुणाल ॲस्पयार सोसायटी कडे जाणाऱ्या मुख्य रत्यावर पथदिवे बसविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांच्या वतीने औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांकडे निवेदन देत करण्यात आली होती. याची दखल घेत पथदिवे बसविण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे
बाणेर येथील कुणाल ॲस्पयार सोसायटी कडे जाणाऱ्या मुख्य रत्यावर पथदिवे नसल्यामुळे याठिकाणी मद्यपींचा अड्डा बनला होता. यामुळे माता-भगिनिंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता तसेच येथील नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठी अडचण निर्माण झाली होती. म्हणून यासाठी याठिकाणी पथदिवे बसवण्यासाबंधी पत्र देऊन सहाय्यक आयुक्तांकडे पथदिवे बसविण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला यश आले असून पथदिवे बसविण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय दूर करण्यात आम्हाला यश आले. – जयेश मुरकुटे (कार्याध्यक्ष, कोथरूड विधानसभा,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार))


More Stories
बालेवाडीत भूमाता कृषी मंचच्या वतीने अजित दादा पवार विमान अपघात प्रकरणी VSR कंपनीचा निषेध; होळी निमित्त केले प्रतीकात्मक दहन..
सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सवाअंतर्गत सोमेश्वर चषक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा; सिद्धांत गायकवाड, रियान मोहम्मद, संकलेचा जिनम, गोरांक्ष खंडेलवाल, विहान कांबळे संयुक्त आघाडीवर
बालेवाडी-वाकड मिसिंग लिंकची उच्च न्यायालयाकडून दखल, जमीन संपादित करुन काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश, ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश..