बालेवाडी :
भाजपचे शहर चिटणीस लहु बालवड यांच्या ‘लहू बालवडकर सोशल वेलफेअर’ व ‘सनराईस मेडिकल फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ‘अटलसेवा महाआरोग्य’ शिबीराचं आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरही उपस्थित होते. यानंतर शिबिराला सुरुवात करण्यात आली. आज संपूर्ण दिवसभरात या शिबीराला लोकांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळाला. आज देखील हे शिबीर सुरू राहणार आहे.
आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती असून निरोगी आयुष्य हेच माणसांच्या जीवनाचे खरी महत्व आहे. त्यामुळेच खर्जिक आजारांवरती उपचार हे पूर्ण:त मोफत मिळावे हा संकल्प लहु बालवडकर यांनी ठेऊन अटलसेवा महाआरोग्य शिबीर सुरू करण्यात आले. दिनांक २४ जानेवारी रोजी जवळपास नऊ हजार पेक्षा अधिक लोकांची नाव नोंदणी झाली. यात विविध आजारांची तपासणी, चाचण्या तसेच लोकांना औषध देखील मोफत देण्यात आली. यात लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत नागरिकांनी मोफत तपासणी करून घेतली.
याप्रसंगी सनराईज मेडिकल फाउंडेशनचे डॉक्टर सतीश कांबळे, ह.प. महाराज चैतन्य महाराज वाडेकर, डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, मा. नगरसेवक अमोल बालवडकर, मा. नगरसेविका ज्योती कळमकर, मा. नगरसेविका स्वप्नाली सायकर, पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, उत्तर मंडल अध्यक्ष, सचिन पाषाणकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, सचिन दळवी, मोरेश्वर बालवडकर, अस्मिता करंदीकर, उमा गाडगीळ, सुभाष भोळ आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी लहु बालवडकर यांच्या आरोग्य सेवेचं भरभरून कौतुक केले. तसेच कोविडचा काळ सगळ्यांनी अनुभवला आहे. त्यानंतर आपल्या सर्वांच्या आयुष्यात आरोग्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. अशा परिस्थितीत अशी आरोग्य शिबीर सर्वांसाठी मोफत घेणे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. बालवडकर यांनी घेतलेल्या शिबीरात अजून लोकांनी येऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्या, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. तसेच यापासून अशी शिबिरे प्रत्येकाने घेतली पाहिजेत, भरवली पाहिजेत, असेही चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटले.
दरम्यान, अटल सेवा महाआरोग्य शिबीराचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व तपासण्या आणि शस्त्रक्रिया अगदी मोफत होणार आहेत. यासाठी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील ६० नामांकित रूग्णालय आणि तज्ञ डॉक्टर सहभागी झाले आहेत. आज अनेक लोकांनी प्रत्यक्ष शिबिरात येऊन तपासण्या केल्या. त्यावर डॉक्टरांनी औषध उपचार देखील केलेत. अशी आरोग्य सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. ही सेवा अशीच पुढे चालत रहो आणि हे शिबिर उद्यादेखील सुरू राहणार आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अजून या शिबिरात भेट दिली नाही. त्यांनी याठिकाणी येऊन तपासण्या, चाचण्या करून घ्याव्यात, असे आवाहन लहु बालवडकर यांनी केले आहे.
More Stories
बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे आणि पाषाण परिसरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनचा ‘मान्सून सेफ्टी ड्राईव्ह 2025’ उपक्रम..
औंध येथे सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित पुणे आयडॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न*
महाळुंगे आणि सुस परिसरातील नागरिकांच्या समस्यां सोडविण्यावर भर देणार आमदार शंकर भाऊ मांडेकर यांचे ‘जनता दरबार’, मध्ये नागरिकांना आश्वासन…