बालेवाडी :
बालेवाडी बाजीगर संघटनेच्या वतीने आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर यांच्या विशेष सहकार्याने ‘बालेवाडी गावकी २०२५’ कबुतरांची स्पर्धा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संजय फार्म दसरा चौक बालेवाडी येथे घेण्यात आली. या स्पर्धेला भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली होती.
बालेवाडी मधील युवा तरुण पिढीच्या माध्यमातून ‘बालेवाडी गावकी’ चे आयोजन करण्यात आले. हि आगळी वेगळी स्पर्धा युवकांना आनंद देते. या स्पर्धेच्या निमित्ताने नवीन 251 कबुतरे सोडण्यात आली. उपस्थित सर्व युवकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
– राहुल बालवडकर ( उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)
यावेळी शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश तात्या बालवडकर, युवा नेते सागर बालवडकर, पो. पाटील आनंदा कांबळे, संदीप बालवडकर, किरण धेंडे, रोहित धेंडे, पाडळे पाटील आणि युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये शशिकांत बालवडकर, प्रतीक बालवडकर, शशिकांत कांबळे, अमित बालवडकर, सुरेश बालवडकर, सुमित कांबळे, आकाश मते, अमित बालवडकर, सुनील जामखेडे यांचे विशेष सहकार्य लाभले.




More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!