May 21, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

म्हाळुंगे येथील गोदरेज सोसायटीतील नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार : समीर चांदेरे

म्हाळुंगे :

म्हाळुंगे येथील गोदरेज सोसायटीतील सन्माननीय सभासद आणि सोसायटी पदाधिकाऱ्यांशी बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या सोबत संपन्न झाली. यावेळी सोसायटीच्या नागरी समस्या, विकासात्मक अपेक्षा आणि रहिवाशांच्या हिताच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

सहकार्य आणि संवादाच्या माध्यमातून सोसायटीच्या प्रगतीसाठी पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा.बाबूरावजी चांदेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्या लवकरात लवकर सोडविण्याचा आमचा मानस आहे – समीर चांदेरे (युवक अध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)