September 17, 2024

Samrajya Ladha

पुणे लिग कबड्डी स्पर्धा आणि सतेज करंडक २०२३ या दोन्ही स्पर्धांचे अंतिम सामने आज..

महाळुंगे- बालेवाडी :

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सतेज संघ बाणेर आयोजित पुणे लिग कबड्डी स्पर्धा आणि सतेज करंडक २०२३ या दोन्ही स्पर्धांचे अंतिम सामने आज रंगणार आहे.

युवा नेते मा.पार्थ आणि जय अजितदादा यांच्या शुभहस्ते उदघाटन झालेली हि स्पर्धा अतिशय रंगतदार झाली व अंतिम टप्प्यात येऊन पोचली. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ देखील आयोजित केलेला आहे.

यंदा सलग ५ व्या वर्षी आपण कबड्डी स्पर्धांचे आंतरराष्ट्रीय स्टॅंडर्डस नुसार आयोजन करत असल्याने राज्यातील कबड्डी पट्टुंना मोठे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे समाधान आहे – बाबुराव चांदेरे (सरकार्यवाह महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, मा. अध्यक्ष स्थायी समिती पुणे महानगर पालिका)

नवोदित युवा खेळाडूंना आशीर्वाद आणि प्रोत्साहन देण्यासाठी अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम बापू जाधव, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतलाताई खटावकर, वासंती बोर्डे यांच्यासारखे दिग्गज आणि जेष्ठ कबड्डी खेळाडू उपस्थित होते. तसेच वीरधवल जगदाळे, संजोग वाघेरे आदी मान्यवर तसेच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदीधिकारी-कार्यकारणी सदस्य आणि कबड्डी खेळावर प्रेम करणारे क्रीडारसिक उपस्थित हि स्पर्धा अंतिम टप्प्यात पोचली असुन पंचांनी उत्तम प्रकारे केलेल्या कामगिरी मुळे प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे ही स्पर्धा उलेखनिय ठरली.

पुणे लीग कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना वेगवान पुणे आणि शिवनेरी जुन्नर यांच्यात तर सतेज करंडक २०२३ स्पर्धेचा महिला गटातील अंतिम सामना शिवशक्ती संघ मुंबई विरुद्ध राजमाता जिजाऊ संघ पुणे यांच्या तर पुरुष गटांमध्ये बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन विरुद्ध एनटीपीसी नंदुरबार या संघात होणार आहे.

स्थळ : बॉक्सिंग हॉल, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल,
म्हाळुंगे – बालेवाडी, पुणे.