September 8, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी येथील चेतक स्पोर्टस् क्लब ने मिळविले पुणे जिल्हा कुमार गट अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्घेत मिळविले विजेतेपद..

कुमारी गटात विजयमाला कबड्डी संघ विजयी तर प्रकाशतात्या बालवडकर संघ उपविजयी

बाणेर :

पुणे जिल्हा कुमार गट अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्घेत कुमार गटात चेतक स्पोर्टस् क्लब बालेवाडी तर कुमारी गटात विजयमाला कबड्डी संघ पुणे यांनी पटकावले विजेतेपद. या स्पर्धेचा “पारितोषिक वितरण समारंभ” स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांच्या हस्ते संपन्न झाला.

 

पारितोषिक वितरण समारंभास अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतलाताई खटावकर, नियामक मंडळाच्या सदस्या वासंतीताई सातव, सतेज संघाचे अध्यक्ष अर्जुन शिंदे, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समिर चांदेरे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यध्यक्ष दत्तात्रय कळमकर, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह श्री दत्तात्रय झिंजुर्डे, नियामक मंडळांचे सदस्य नाथाभाऊ वाळके, प्रकाश बालवडकर, पंच मंडळ अध्यक्ष इम्रान शेख, संतोष जगदाळे, उद्योजक अरुण खंडेलवाल, अर्जुन ननावरे, पुनम विशाल विधाते, वैशाली हर्षल तापकिर, सोनल चाकणकर, अजिंक्य निकाळजे, कोमल तांबे अदि मान्यवर उपस्थित होते.

पुणे जिल्हा कुमार गट अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्घेत (पुणे शहर विभाग)
प्रथम क्रमांक – चेतक स्पोर्ट क्लब बालेवाडी (पुरुष विभाग) व विजयमाला कबड्डी संघ पुणे (महिला विभाग)
द्वितीय क्रमांक – सरनोबत पिलाजी गोळे संघ पुणे (पुरुष विभाग) व प्रकाशतात्या बालवडकर संघ बालेवाडी (महिला विभाग)
तृतीय क्रमांक – युवराज बेलदरे संघ पुणे (पुरुष विभाग) व तिरंगा स्पोर्ट क्लब पुणे (महिला विभाग)
चतुर्थ क्रमांक – सचिन दोडके क्रीडा प्रतिष्ठान पुणे (पुरुष विभाग) व पतंगराव कदम संघ पुणे (महिला विभाग)

सदर स्पर्धा आस्वम रियॅलिटी ॲड डेव्हलपर्स, बाणेर यांनी आयोजित केलेल्या होत्या.