पुणे :
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने प्रशांत जाधवर फाऊॅडेशन आयोजित मुख्यमंत्री चषक कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२३-२४ स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मुलींच्या पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण संघांनी ऐतिहासिक कामगिरी करत विजयी व उपविजयी ठरले तर मुलांच्या संघामध्ये पिंपरी चिंचवड संघाने उपविजेतेपद तर पुणे ग्रामीण संघाने तृतीय क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नामुळे कबड्डीची वाढ आणि प्रसार होण्याकरिता तसेच खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळावी याकरीता अनेक मोठया जिल्ह्यातील संघाची विभागणी करत नविन संघ खेळण्यास मान्यता देण्यात आली होती. या संधीचा पुरेपूर फायदा घेत पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण संघांनी यश संपादन केले.
भविष्यात चांगले खेळाडू निर्माण व्हावेत, या नवोदित खेळाडूंनी शक्ती, सचोटी आणि चपळतेचा कस लावून स्वतःची प्रगती करावी यासाठी राज्यात प्रथमच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने कुमार व कुमारी कबड्डी खेळाडू कौशल्य आणि अंतरिम प्रशिक्षण शिबिर आयोजित केले. त्याचा खेळाडूंनी फायदा घेत कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२३-२४ मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन चे नाव उंचावले. खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांचे अभिनंदन : दत्तात्रय कळमकर(कार्याध्यक्ष पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन)
पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण कुमार कुमारी गट कबड्डी संघानी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत मिळालेल्या संधीचा फायदा घेत घवघवीत यश संपादन केले त्याबद्दल खेळाडू प्रशिक्षक आणि व्यवस्थापक तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन : दत्तात्रय झिंजुर्डे (सरकार्यवाह पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन)
स्पर्धेचा अंतिम निकाल :
कुमारी गटात पुणे जिल्हा (पिंपरी-चिंचवड विभाग) व कुमार गटात मुंबई उपनगर (पश्चिम विभाग) संघ विजयी झाले.
कुमार गटात पुणे जिल्हा (पिंपरी-चिंचवड विभाग) तर कुमारी गटात पुणे जिल्हा (ग्रामीण विभाग) संघ उपविजयी झाले.
तृतीय क्रमांक कुमार गटात पुणे जिल्हा (पुणे ग्रामीण विभाग) तर कुमारी गटात मुंबई उपनगर
चतुर्थ क्रमांक कुमार गटात नंदुरबार जिल्हा तर कुमारी गटात कोल्हापुर जिल्हा.
More Stories
कोल्हापूर संघ ठरला क्रेडाई महाराष्ट्र प्रीमियर लीगचा विजेता..
बालेवाडी येथील चेतक स्पोर्टस् क्लब ने मिळविले पुणे जिल्हा कुमार गट अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्घेत मिळविले विजेतेपद..
डॉज बॉल स्पर्धेमध्ये ‘पेरिविंकल’च्या विद्यार्थिनींनी केले यश संपादन