June 4, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

डॉज बॉल स्पर्धेमध्ये ‘पेरिविंकल’च्या विद्यार्थिनींनी केले यश संपादन

बावधन :

‘चैतन्य विद्या प्रतिष्ठान’च्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल, बावधनमधील १७ वर्षाच्या खालील मुलींच्या संघाने पुणे जिल्हा आयोजित डॉजबॉल स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.

संघातील ईश्वरी दगडे आणि सिद्धी मोकाशी या विद्यार्थ्यांनींची विभागीय संघासाठी निवड झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल आणि संचालक सौ. रेखा बांदल यांनी विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन केले. मुख्याध्यापिका सौ. स्वाती कोल्हे, क्रीडा शिक्षक श्रेयश गायकवाड आणि सुरज साठे यांनी विद्यार्थ्यांनीना मार्गदर्शन केले.

हा सामना ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव क्रिडानिकेतन कल्पना चावला स्कूल येथे घेण्यात आला.