December 3, 2024

Samrajya Ladha

अखिल न्यू बाणेर मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजीत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीरास उत्स्फर्त प्रतिसाद…

बाणेर :

अखिल न्यू बाणेर मित्र मंडळ, बाणेर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.

या शिबिरामध्ये 124 लोकांचे आरोग्य तपासणी करण्यात आली व 67 लोकांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले. मंडळाच्या वतीने रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले.

सामाजिक भान ठेवत मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होतात.