हिंजवडी :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या पिरंगुट शाखेतून शुक्रवार दिनांक 13/09/2024 रोजी पवार पब्लिक स्कूल हिंजवडी येथे झालेल्या तालुका स्तरीय कब्बड्डी स्पर्धेमध्ये पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या पिरंगुट शाखेच्या इयत्ता नववी व दहावीच्या संघाने १७वर्षीय वयोगटात कब्बड्डी या सांघिक खेळामध्ये द्वितीय स्थान पटकावले.
हिंजवडी मध्ये झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत एकूण 24 च्या वर कबड्डी संघांचा सहभाग होता. त्यात पेरीविंकल स्कूल च्या पिरंगुट शाखेतील १७ वर्षीय खालील वयोगटात हर्ष लोहार, ओमसाई घोरपडे, वेदांत इंगळे, उज्ज्वल चौधरी, अर्णव सावंत,दीप महाजन,निदीप राऊत, श्रीराज पांढरे, अथर्व वराडे, सोहम सातव आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता. या कबड्डी संघाने पटकावलेले हे द्वितीय स्थान ही खरोखरचं अद्वितीय बाब असून कौतुकाची व मेहनतीची मिळालेली थाप आहे असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजेंद्र बांदल यांनी केले व सर्वांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी सज्ज होण्यास प्रोत्साहित केले.
तसेच संचालिका सौ रेखा बांदल व मुख्याध्यापक अभिजित टकले सर यांनी त्याचे मनापासून अभिनंदन करत कौतुकाची थाप दिली. मुलांच्या यशामागे पिटी चे शिक्षक मणेरे हनुमंत यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.
More Stories
बाणेर येथे मणिपाल हॉस्पिटलमध्ये मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबिर..
बालेवाडी येथे आमदार मेघनाताई बोर्डीकर यांचा मराठवाडा मित्र परिवाराच्या वतीने जाहीर सत्कार संपन्न झाला..
सुसगाव येथील सुखवाणी पॅनोरमा सोसायटी मधील गणेश मंदिराच्या सभा मंडपाच्या कामाचा शुभारंभ समीर चांदेरे यांच्या हस्ते संपन्न..