May 22, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर गावाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत ज्ञानेश्वर मित्र मंडळाचा वाटा मोठा : समीर चांदेरे (युवक अध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)

बाणेर :

बाणेर येथील सर्वात जुन्या ज्ञानेश्वर मित्र मंडळाने आयोजित केलेल्या गणेशोत्सवाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे आणि राष्ट्रीय काँग्रेस कमिटी पुणे शहर उपाध्यक्ष जीवन चाकणकर यांनी श्रींची आरती करत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

 

ज्ञानेश्वर मित्र मंडळ आमच्या बाणेर भागातील जुने मंडळ असून, हे मंडळ वर्षभर वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, रक्तदान, रांगोळी स्पर्धा, पूरग्रस्तांना मदत, सामाजिक-राजकीय क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून लोकसेवा करण्याला प्राधान्य देत असतात. बाणेर गावाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत ज्ञानेश्वर मित्र मंडळाचा वाटा खूप मोठा आहे : समीर चांदेरे (युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)

यावेळी निवृत्ती सायकर, युवराज कुदळे, संजय ताम्हाणे, सुनील सायकर, गणेश सायकर यांच्यासह स्थानिक नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते.