September 19, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथील योगीराज पतसंस्थेचे कार्य सर्व दूर पोहोचलेले : माजी कृषिमंत्री शशिकांत भाऊ सुतार

बाणेर :

महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री,शिवसेना उपनेते शशिकांतभाऊ सुतार यांनी बाणेर येथील योगीराज पतसंस्थेस सदिच्छा भेट दिली.

यावेळी प्रास्ताविक करताना योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर म्हणाले की, योगीराज पतसंस्थेने सदैव आपल्या ठेवीदार आणि सभासदांच्या विश्वासात पात्र ठरत पतसंस्थेच्या यशाचा आलेख चढता ठेवला आहे. पतसंस्थेने केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता समाजा प्रती असणारी बांधिलकी जपण्याचा काम नेहमीच केले आहे. पतसंस्था नेहमीच गरीब गरजू लोकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते. शशिकांत भाऊ सुतार यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये आपल्या कामामुळे जनसामान्यांमध्ये आदराचे स्थान निर्माण केले त्यांचे योगीराज पतसंस्थेमध्ये सहर्ष स्वागत आहे.

योगिता पतसंस्थेने सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याची  प्रसिद्धी सर्व दूर पोहोचलेली आहे. बाणेरच्या विकासात प्रथम नगरसेवक व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांचे मोलाचे योगदान आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर माझा राजकीय वारसा पुढे नेणाऱ्या माझे चिरंजीव पृथ्वीराज यांना मुलाचे सहकार्य आवश्यक आहे ते नक्कीच मिळेल हा विश्वास आहे : शशिकांत भाऊ सुतार (माझी कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य)

यावेळी माजी नगरसेवक तानाजी निम्हण, विद्यांचल स्कूलचे संस्थापक अशोक मुरकुटे, माजी नगरसेवक अंकुश तिडके,शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, माजी संचालक अशोक रानवडे, नाना वाळके, जीवन चाकणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी संचालक अमर लोंढे यांनी आलेल्या सर्वांचे स्वागत केले तर उपाध्यक्ष राजेश विधाते यांनी आभार मानले.