August 27, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

१३१ वर्षानंतरही स्वामीजींचे विचार महत्वाचे : पेरीविंकल स्कूल संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल

पिरंगुट :

स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ मध्ये जागतिक सर्वधर्म परिषदेत ऐतिहासिक भाषण केले होते. या ऐतिहासिक घटनेला १३१ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने शैक्षणिक क्षेत्रात कायमच आपला आगळावेगळा ठसा उमटवून एक पाउल पुढे रहाणा-या पेरीविंकल – पिरंगुट शाखेत आज एक अनोखा उपक्रम राबवला.

 

यात काही विद्यार्थी स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा करून आले होते. त्यांनी विवेकानंदांचे विचार सांगितले. पल्लवी सकपाळ टीचरने ‘विवेकानंद यांनी केलेल्या भाषणाचे वाचन केले. स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीवर विचारांवर आधारित चर्चासत्र , प्रश्न मंजुषा, आणि चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

विवेकानंदांच्या विचारांचे कालातीत महत्त्व लक्षात घेता आजच्या या विद्यार्थ्यांना हे कालातीत विचार समजणे महत्वाचे आहे, आणि हे लक्षात घेऊन या उपक्रमाचे आयोजन शाखेचे मुख्याध्यापक डॉ. अभिजित टकले यांच्या संकल्पनेप्रमाणे शाखेतील सर्वच शिक्षकांनी अत्यंत उत्साहात साजरा केला.

कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनाला व्यवस्थापनाची साथ तर महत्वाची असतेच. नेहमी प्रमाणे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद बांदल सर, संचालिका रेखा बांदल यांचे मार्गदर्शन, सर्व शिक्षक वर्ग, आणि विद्यार्थी यांची उत्तम साथ मिळाली. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यावर संस्कार करण्याचा पेरीविंकलचा आणि शालेय शिक्षणाचा हेतू साध्य झाला हेच खरे.