September 19, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथे डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला माजी कृषिमंत्री शिवसेना उपनेते शशिकांतभाऊ सुतार यांची सदिच्छा भेट.

बाणेर :

महारष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री शिवसेना उपनेते शशिकांतभाऊ सुतार यांनी ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला आज सकाळी सदिच्छा भेट दिली.

यावेळी शिवसैनिक डॉ.दिलीप मुरकुटे यांनी स्वागत करताना सांगितले की, जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून शशिकांत भाऊंनी नेहमी समाजासाठी काम केले आहे. कोथरुडचा कायापालट करण्यात भाऊंचा मोठा हात होता.त्यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज सुतार हे आमदार म्हणुन निवडून येतील याची खात्री आहे. आम्ही शिवसैनिक म्हणुन त्यांच्या सोबत असणार आहे.

यावेळी माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांनी सांगितले की, सर्वसामान्य कार्यकर्त्याला शशिकांतभाऊंनी नेहमी ताकद दिली. मंत्री म्हणून भाऊंनी कोथरुडचा विकास केला. आज त्यांचे चिरंजीव राजकारणात भाऊंचा आदर्श समोर ठेऊन काम करत आहे. महाविकास आघाडीचा भक्कम उमेदवार म्हणून ते विजयी होतील.

माझा राजकीय जन्म शिवसैनिक म्हणुन झाला व अंत देखील शिवसेनेत होईल. शिवसेना प्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ दिले. कोथरुड परिसराची विकासमय दिशा ठरवत विकासाच्या बाबतीत कोथरुडचे नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवले. पुढे देखील चिरंजीव पृथ्वीराज उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली समाजाचे काम करत आहे. समाजाचे केलेले काम आणि पक्षाची केलेली बांधणी पाहता मिळालेल्या संधीचे सोने होईल याची खात्री : शशिकांत सुतार (माजी कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य)

यावेळी पाषाणचे माजी नगरसेवक तानाजी निम्हण, अंकुश तिडके माजी नगरसेवक, राम गायकवाड, रखमाजी पाडाळे, शशिकांत दर्शने मामा, संतोष भोसले, रितेश भादाडे, अविनाश गायकवाड, ऋषिकेश कांबळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.