पुणे :
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यातील महिलांसाठी सुरु केलेल्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेला मिळालेल्या प्रतिसादामुळे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री.दिपकभाऊ मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण आणि पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष राकेश नाना कामठे यांच्या उपस्थितीमधे पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील विविध ठिकाणी “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहिमेचा “श्री गणेशा” करण्यात आला.
शिवाजीनगर विधानसभा युवक अध्यक्ष श्रीधर भाऊ स्वामी यांनी ठिकठिकाणी राबवलेल्या स्वाक्षरी मोहिमेमुळे माता-भगिनींमधे लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता अनुभवता आली. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रांत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच छ.शिवाजीनगर मतदारसंघातील प्रमुख सार्वजनिक मंडळांना भेटी देवून स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या : समीर चांदेरे(युवक अध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)
याप्रंसगी श्री.बाळासाहेब बोडके ( मा.नगरसेवक ,पुणे ), श्री .विनोद आण्णा ओरसे ( मा. नगरसेवक,पुणे ), प्रदेश युवक सरचिटणीस श्री.महेश हांडे, स्विकृत नगरसेवक श्री.करीम भाई शेख, पुणे शहर उपाध्यक्ष श्री. विजय भाऊ जाधव व श्री.विजय बकुळ, सामाजिक कार्यकर्ते श्री.सुरेश मामा जौजाळ, राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष श्री.सूरज गायकवाड, श्री .निखिल शर्मा, श्री.निशिकांत कांबळे, राष्ट्रवादी युवती कार्याध्यक्षा लावण्याताई शिंदे, राष्ट्रवादी युवती उपाध्यक्षा श्वेताताई मिस्त्री, छ.शिवाजीनगर मतदार संघाचे युवक कार्याध्यक्ष श्री. चैतन्य चून्नाडी, प्रभाग क्रमांक 14 चे अध्यक्ष श्री.उमेश भंडारी आदि पदाधिकारी उपस्थित होते.



More Stories
पुणे आयडॉल २०२६ ची महाअंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व येथे – ५६० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘व्हॉइस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा