October 9, 2024

Samrajya Ladha

बाणेर-बालेवाडी-सुस आणि म्हाळुंगे परिसरातील महिलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित गौरी सजावट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न…

बालेवाडी :

बाणेर-बालेवाडी-सुस आणि म्हाळुंगे परिसरातील खास महिलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरी सजावट स्पर्धा होत असून या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांच्या शुभहस्ते गतविजेत्या महिला सौ.सुवर्णाताई ज्ञानेश्वर बालवडकर यांच्या बालेवाडी येथील निवासस्थानी संपन्न झाले.

सन २००६ सालापासुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बाणेर-बालेवाडी-सुस आणि म्हाळुंगे मधील महिलांसाठी आपली संस्कृती जोपासण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून सुरू केलेल्या या स्पर्धेसाठी महिलांचा फार मोठा उत्साह पाहायला मिळतो. या स्पर्धेद्वारे बक्षिसाची लयलूट करण्यासाठी महिला अतिशय उत्साहात आपल्या कलागुणांना वाव देत अतिशय कल्पक गौरी सजावट करत या स्पर्धेत उतरत असतात. दरवर्षी होणार या स्पर्धेसाठी महिला कला व कल्पकता वापरून आकर्षक आरास करत मोठी जय्यत तयारी करत असतात.

दरवर्षी आम्ही घडवणाऱ्या गौरी सजावट स्पर्धेसाठी महिला मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी मिळणारा महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता ही स्पर्धा भरवताना आम्हाला विशेष समाधान लाभते. संसाराच्या व्यापातून महिलांनी बाहेर पडावे व काही क्षण आपल्या कल्पकतेला वाव देत आपली संस्कृती जोपासत गौरी सजावट स्पर्धेत भाग घेऊन आनंद उपभोगावा या हेतूने भरविली जाणारी ही स्पर्धा यावर्षी देखील मोठ्या उत्साहात यशस्वी होईल याची खात्री आहे : समीर चांदेरे (अध्यक्ष : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर)

गेली सतरा वर्ष यशस्वीरित्या भरविल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये आम्ही महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करत असतो. महिला आपल्या संस्कृतीचा ठेवा जोपासत आपल्या कलागुणांचा वापर करत अतिशय कल्पक बुद्धीने गौरी ची आरस महिला करत असतात. त्यांच्या या कलागुणांना कौतुकाची थाप पडावी आणि त्यांचा उत्साह वाढावा म्हणून ही स्पर्धा भव्य प्रमाणात भरवली जाते : राहुल बालवडकर (उपाध्यक्ष : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)

यंदाच्या गौरी सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोमवार दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता बंटारा भवन, मर्सिडीज शोरूम जवळ, मुंबई-बंगलोर महामार्ग, बाणेर येथे संपन्न होणार आहे.