October 9, 2024

Samrajya Ladha

सोमेश्वरवाडी येथे सचिन दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

सोमेश्वरवाडी :

सोमेश्वरवाडी पाषाण येथे सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने व विठ्ठल सेवा गणेशोत्सव मंडळ यांच्या माध्यमातून भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल सरचिटणीस सचिन दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी ‘खेळ रंगला पैठणीचा’ व मुलींसाठी ‘नृत्य स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील सर्व विजेत्या महिला व मुलींना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बक्षिसे व गौरव चिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच यावेळी उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनी ऋतुजा राऊत व करूणा घुमरे यांच्या शिक्षणासाठी सचिन दळवी यांच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.हि आर्थिक मदत मंत्री पाटील यांच्या हस्ते विद्यार्थीनींना सुपुर्त करण्यात आली.

सचिन भाऊ दळवी आम्हा भगिनिंच्या पाठीशी नेहमी ठाम उभे राहतात. नामदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातुन त्यांनी महिलांसाठी सतत वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. अशा समाजसेवी व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपले राजकीय भवितव्य यशाने भरभरून जावे या सदिच्छा : ऋतुजा राऊत( होतकरू विद्यार्थिनी)

गेल्या अनेक वर्षांपासून सचिन दळवी भाजपा पक्षाच्या माध्यमातुन सतत परिसरातील नागरिकांची सेवा करत आहे. विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहचवत आहे. त्यांची समाजाप्रती कार्याची वाढणारी उंची कौतुकास्पद आहे. त्यांच्या राजकीय अपेक्षा पूर्ण होव्यात म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत अशीच समाजसेवा त्यांच्या हातून घडो याच वाढदिवसाच्या शुभेच्छा : नामदार चंद्रकांत पाटील (उच्च तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य)

या स्पर्धेतप्रथम क्रमांकाचे बक्षीस टिव्ही रोहिणी कांबळे यांनी, द्वितीय बक्षीस फ्रिज कविता जोगदंड यांनी, तृतीय बक्षीस पिठाची गिरणी कल्पना झोंबाडे यांनी चौथे बक्षीस ॲक्वागार्ड तेजल मोरे यांनी तर पाचवे बक्षीस गॅस शेगडी हिरा बिरदवडे यांनी पटकावले. तर खास लकी ड्रॉ द्वारे विजेत्या ठरलेल्या दैवशाला मोरे, सुरेखा जोरे, धनश्री शिर्के, लक्ष्मी आगळे व काजल म्हस्के या महिला हेलिकॉप्टर सफरच्या विजेत्या ठरल्या.

मोनिका करंदीकर यांनी’खेळ रंगला पैठणीचा’ हा कार्यक्रम सादर केला तर योगेश सुपेकर यांनी सुत्रसंचलन केले. सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने आपल्या उपस्थितीने रंगत आणली.

यावेळी सचिन दळवी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष ओम दळवी, अंकिता सचिन दळवी, भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा नेते गणेश कळमकर, लहू बालवडकर, प्रकाश बालवडकर, राहूल कोकाटे, रोहन कोकाटे, सचिन सुतार, उत्तम जाधव, विठ्ठल सेवा गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, सोमेश्वरवाडी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील हजारो महिला, पुरुष, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.