October 9, 2024

Samrajya Ladha

पाषाण येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमोद निम्हण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..

पाषाण :

पाषाण येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांच्या निवासस्थानी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी गणेशोत्सवाचे निमित्त साधून सदिच्छा भेट देत गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली व गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी अतीशय खेळीमेळीच्या वातावरणात चंद्रकात दादांनी गप्पा गोष्टी केल्या. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दादांनी परिसराचा आढावा घेतला. परिसरातील विविध समस्या बाबत माहिती माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांनी दिली.

पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी परीसरात नागरी समस्या सोडविल्या जाव्यात म्हणून प्रमोद निम्हण नेहमी प्रयत्न करत असतात. त्यांचा नागरिकांशी असणारा जनसंपर्क पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चंद्रकांत दादांची भेट अतिशय महत्वपूर्ण होती.

यावेळी निम्हण परिवारातील सदस्य माजी नगरसेविका सुषमा प्रमोद निम्हण, विश्वास निम्हण, संदिप निम्हण, प्रसन्न निम्हण, प्रणित निम्हण तसेच चंद्रकांत दादांसोबत भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा नेते गणेश कळमकर, लहू बालवडकर, प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे, आणि पदाधिकारी उपस्थित होते.