पुणे :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या *पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सूस* शाखेला मागील वर्षी झालेल्या अथर्वशीर्ष पठाणा मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाल्यानंतर यातच दुग्धशर्करा योग म्हणजे पेरीविंकल शाळेच्या सूस शाखेतील विद्यार्थ्यांना सलग तिसऱ्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये अथर्वशीर्ष पठण व आवर्तन करण्याचा योग जुळून आला.
इयत्ता ५वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आज म्हणजे मंगळवार दि.१० सप्टेंबर २०२४ रोजी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर येथील गणपतीच्या सभामंडपाच्या गाभाऱ्यात अगदी पुढे बसून अथर्वशीर्ष आवर्तने व पठण करून महाआरतीचा दुग्धशर्करा योग लाभला. शिक्षणाबरोबरच आपल्या संस्कृतीचे जतन करण्याकडे पेरिविंकल चा कायमच कल असतो.
पेरिविंकल च्या सूस शाखेमधून सकाळी ४ वाजता ७ बसेसचे विद्यार्थ्यासाठी शाळेने नियोजन केले होते. बसमधून सुमारे ३५० च्या वर विद्यार्थी व सुमारे ४० ते ५० शिक्षकवृंद हे दगडूशेठ येथील मंदिराच्या गाभाऱ्यात अथर्वशीर्ष आवर्तनाला अगदी उत्साहाने उपस्थित होते. *पहाटे श्रींच्या आरतीचा लाभ घेऊन सकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत च्या वेळात गणपती अथर्वशीर्ष आवर्तने व श्री गणेश जागर करण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ प्रतिष्ठान यांच्या कडून निमंत्रण पत्र शाळेला प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे नियोजन करून सर्व इच्छुक विदयार्थी भक्तांना अथर्वशीर्ष पठनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. श्रीमंत दगडुशेठ हलवाई मंडळाच्या वतीने शाळेच्या संचालिका सौ रेखा बांदल व मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित व HOD सचिन सर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सर्व शिक्षकवृंद यांचा देखील सन्मान करण्यात आला.
अशा प्रकारे गणेश उत्सवात दगडूशेठ येथे जाऊन गणपती अथर्वशीर्ष पठण करण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम पेरिविंकलच्या सूस शाखेने राबवला. लाखो भक्तगणात दगडूशेठ येथे अथर्वशीर्ष आवर्तन करण्याचे निमंत्रण येणे हीच खूप भाग्याची बाब आहे व येवढ्या पहाटे विदयार्थी व शिक्षक यांनी उत्साहाने जाऊन अथर्वशीर्ष आवर्तने करून परत शाळेत येऊन शाळा करणे ही खरंच कौतुकाची बाब आहे असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल सर यांनी केले.
या संपूर्ण आगळ्या – वेगळ्या उपक्रमाचे आयोजन हे शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल व संचालिका सौ रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत यांच्या नियोजनाखाली सचिन पर्यवेक्षक सचिन खोडके व नेहा माळवदे यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्या मदतीने करण्यात आले होते. शाळेतून मंदिर व मंदिरातून शाळा असा प्रवास व आवर्तनाचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. या सगळ्या उपक्रमाचा एक आगळावेगळा उत्साह व आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून आला.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..