बाणेर :
राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्यावतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या नेतृत्वाखाली बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण, सुतारवाडी आणि औंध भागात राहणाऱ्या युवकांसाठी शनिवार दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी मेफिल्ड आयव्ही गार्डन, धनकुडे फार्म्स, औंध-बाणेर लिंक रोड, पुणे येथे भव्य नोकरी महोत्सव आयोजित केला आहे.
नोकरी महोत्सवाच्या निमित्ताने जास्त युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत एक सक्षम युवक बनून स्वताच्या पायावर उभे राहून कुटुंबाला आधार निर्माण झाला पाहिजे हा हेतू आहे. युवकांना योग्य दिशा मिळाली तर आपला घर परिवार बरोबर सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचे योगदान लाभते. म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन उद्याचे भवितव्य घडविण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे तरी अधिकाधिक युवांनी या संधीचा लाभ घ्यावा : समीर चांदेरे (युवक अध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष समीर चांदेरे यांनी युवक अध्यक्ष झाल्यानंतर जास्तीत जास्त युवकांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे करत संघटित केले आहे. पुणे शहरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांनी नोकरी महोत्सवाचे यशस्वी आयोजन राबविले. यावेळी बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण, सुतारवाडी आणि औंध भागात राहणाऱ्या अधिकाधिक युवकांना नोकरी महत्वाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली आहे.
More Stories
बाणेर येथील विधाते वस्ती रोडवरील फुटपाथवर साठलेल्या कचऱ्याचा प्रश्न जयेश मुरकुटे यांच्या प्रयत्नामुळे मार्गी…
सोमेश्वरवाडी येथे नवरात्रोत्सव निमित्त सचिन दळवी सोशल फाउंडेशन आयोजित ‘ग्रुप दांडिया व गरबा महोत्सव’मध्ये महिलांचा सन्मान राखला जावा म्हणून जनजागृती…
पौड शाखेतील पेरीविंकल शाळेत विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांसह गरबा व दांडियाचे आयोजन!!!