म्हाळुंगे :
गणेशोत्सवाचे निमित्त साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष समीर चांदेरे यांनी म्हाळुंगे येथील पुराणिक सोसायटीच्या सर्व फेजेसमधे आयोजित गणेश उत्सवाला भेट देत सोसायटीत राबविले जात असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. गणेशोत्सवाचे निमित्ताने सोसायटी मधील नागरीकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या नागरी समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याचा उद्देश चांदेरे यांचा आहे त्या दृष्टीने त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे.
आपली संस्कृती पुढील पिढी मधे रुजावी, गणेशोत्सवाचे महत्व कळावे म्हणून पुराणिक सोसायटीने लहान मुलांचा संस्कृत श्लोक पठणाचा अभिनव कार्यक्रम राबवला याबद्दल सोसायटीमधील युवा, जेष्ठ नागरिक, माताभगिनी आणि पदाधिकाऱ्यांचे कौतुक केलं. म्हाळुंगे येथील तीर्थ टॉवर व इतर सोसायटीमधील नागरी प्रश्न निश्चितपणे सोडविणार असल्याचा विश्वास नागरीकांना दिला : समीर चांदेरे(युवक अध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)
यावेळी समीर चांदेरे यांनी म्हाळुंगे भागातील तीर्थ टॉवर सोसायटीमधील नुकत्याच सोसायटीच्या झालेल्या अंतर्गत निवडणुकीत विजयी झालेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
बाणेर,औंध डी. पि. रोड येथील पुष्पक नगर सोसायटी मध्ये आयोजित गणेशोत्सवाला देखील भेट देत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..