सोमेश्वरवाडी :
सोमेश्वरवाडी येथे सचिन दळवी सोशल फाउंडेशन च्या वतीने भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल सरचिटणीस सचिन दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ रंगला पैठणीचा व मंगळागौर हा खास महिलांचा आवडता कार्यक्रम उद्या दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी ६:०० वाजता सोमेश्वर मंदिरासमोर आयोजित करण्यात आलेला आहे.
यावेळी चला हवा येऊ द्या फेम गेम्स क्वीन मोनिका करंदीकर आणि प्रसिद्ध निवेदक अभिनेता योगेश सुपेकर यांचा ‘खेळात रंगुया पैठणीच्या’ जबरदस्त पावर पॅक गेम शो आणि सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
यावेळी काढण्यात येणाऱ्या लकी ड्रॉ विजेत्या महिलेस आपल्या परिसरात प्रथमच हेलिकॉप्टरची राईड आणि पैठणी भेट दिली जाणार आहे. तसेच या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू भेट दिली जाणार आहे.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!