November 21, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथील प्राईड प्लॅटिनम सोसायटीमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने कायम सोसायटीचे प्रश्न सोडविणाऱ्या चांदेरे कुटुंबीयांचा सत्कार..

बाणेर :

बाणेर येथील प्राईड प्लॅटिनम सोसायटीमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवत असते. यावर्षी तणावमुक्त जीवन जगण्याचा आणि जगण्यातील आनंद कसा घ्यावा हा संदेश देणारा The Mad add Show हा नाट्यउपक्रम राबवला आहे. यावेळी यावेळी सोसायटीतील नागरिकांचे अनेक छोटे मोठे प्रश्न सोडवण्यासाठी कायम अग्रेसर असणाऱ्या चांदेरे कुटुंबाचा सत्कार सोसायटीच्या वतीने करण्यात आला.

गणेशोत्सव म्हणजे सामाजिक बांधिलकी आणि बंधुता वाढवण्याचा सण, गणेशोत्सवाचा हाच वारसा पुढे घेवून जात आहेत आमच्या प्रभागातील प्राईड प्लॅटिनम सोसायटीमधील नागरिक. प्राईड प्लॅटिनम सोसायटी प्रत्येक वर्षी एक परिवार म्हणून एकत्र येत गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवत आले आहेत यंदा देखील तणावमुक्त जीवन जगण्याचा आणि जगण्यातील आनंद कसा घ्यावा हा संदेश देणारा The Mad add Show हा नाट्यउपक्रम राबवला आहे. गणेशोत्सवानिमित्त चांदेरे परिवाराने सोसायटीला भेट दिली त्यावेळी या नाट्याचा आनंद घेवून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे या उपक्रमाबाबत अभिनंदन आणि कौतुक केलं.

पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूरावजी चांदेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चांदेरे कुटुंब प्रभागातील नागरिकांच्या मदतीसाठी कायम धावत आलो आहोत. प्रभागातील प्राईड प्लॅटिनम सोसायटीमधील नागरिकांचे रस्ता, स्वच्छता, पाणी यासारखे अनेक छोटे मोठे नागरी प्रश्न आपण वेळोवेळी दूर केले आहेत, आपण प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पोचपावती म्हणून गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्राईड सोसायटीने आज चांदेरे कुटुंबीयांचा केलेला सत्कार विनयतेने स्वीकारला. आम्ही कायमच नागरिकांच्या सेवेत आहोत आणि यापुढे देखील सोसायटीच्या कायम सेवेत राहू असा चांदेरे कुटुंबीयांनी शब्द दिला.

यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे, माणिकतात्या गांधिले, विद्याधर तात्या गांधिले, सरलाताई चांदेरे, सौ पूजा किरण चांदेरे, यांच्यासह स्थानिक मान्यवर उपस्थित होते.