पिरंगुट :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पिरंगुट शाखेमधील विद्यार्थ्यांनी गणेश चतुर्थीला अत्यंत दिमाखात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली होती. बचतीचे महत्त्व विशद करणा-या आणि त्यातून सामाजिक संदेश देणा-या देखाव्यातून शाळेने जनजागृतीही केली. गेले ६ दिवस गणेशोत्सवा निमित्त शाळेत रोज सकाळी वर्ग निहाय आरत्या, प्रसाद वाटप, गाण्याचे कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, अथर्व शीर्ष पठण, संस्कृत श्लोक पाठांतर अशा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल हे अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक धरोहर जपणारी पेरीविंकलची परंपरा हे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे.
सात दिवस या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व मनोभावे आरती करुन आज सकाळच्या आरती नंतर विद्यार्थी व शिक्षकववर्ग काहीशा नाराजीत पण अतिशय उत्साहात जसे गणरायाचे आगमन केले. तसेच बाप्पांचा निरोप देउन पुढील वर्षी लवकर या भावनेने पुढील विसर्जनाची तयारी करत होता. विसर्जनाला पेरीविंकल मधील विद्यार्थी आणि शिक्षक भावूक झाले होते.
पेरीविंकल शाळेच्या पिरंगुट शाखेमधून आज शुक्रवार दि. 13 सप्टेंबर 2024 रोजी ढोल –ताशा व लेझीम च्या गजरात पारंपरिक खेळांच्या सादरीकरणातून श्री गणेशाची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. नऊवारी साड्या नेसून अतिशय उत्साहात विद्यार्थिनी ढोल आणि ताश्याच्या ठेक्यावर लेझीम सादर करत होत्या. त्यांचे हे अनोखे सादरीकरण अनुभवायला नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यातून विद्यार्थी वर्गाचा उत्साह वाढत होता. रांगोळ्यांचे आकर्षक गालिचे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होता. वाटेत ठिकठीकाणी ग्रामस्थ लेझीम सादरीकरण करण्याचा आग्रह करत होते. रस्त्यात गर्दी करून हे लक्ष वेधी सादरीकरण जाणारे येणारे लोक उत्साहात बघत होते. प्रेक्षकांनीही ढोलाच्या तालावर आपली दाद दिली. अशा प्रकारे ढोल ताशाच्या गजरात बाप्प्पांचे विसर्जन करण्यात आले.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाखेचे मुख्याध्यापक डॉ. अभिजित टकले यांनी केले होते. पर्यवेक्षिका पूनम पांढरे, सना इनामदार व पल्लवी नारखेडे यांच्यासह सर्वच शिक्षकांनी सजावट, रांगोळ्या, प्रसाद वाटप, पाहुण्यांचे स्वागत व इतर सर्व कामात आपापल्या परीने हातभार लावला.
अशाप्रकारे सात दिवसांचा हा गणेश सोहळा आणि विसर्जन उत्साहात संपन्न झाले आणि या गणेश सप्ताहाची सांगता लेझीम ताशांच्या गजरात कऱण्यात आली.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..