पाषाण :
मा. कॅबिनेट मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रभाग क्रमांक ९ बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी भागातील गणपती मंडळ यांना भेट दिली व मंडळातील बाप्पाची आरती केली.
पूर्ण दिवस आमदार चंद्रकांत दादा पाटील हे प्रभागात होते. अनेक पदाधिकारी व काही नागरिकांच्या घरच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले, दादांच्या दिवसभर प्रभागातील भेटीने कार्यकर्ते आनंदी झाले. गणपती उत्सव भेटीच्या दरम्यान प्रभागातील नागरिकांचे मत जाणून घेतले, कामाचा आढावा घेतला.
गणेशोत्सवानिमित्त बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी मधील विविध गणेश मंडळांना भेटी देऊन श्रीगणरायाचे दर्शन घेतले. बळीराजा आणि सर्वसामान्य जनतेच्या समृद्धीची प्रार्थना या निमित्ताने गणपती बाप्पाच्या चरणी केली! गणेशोत्सव अत्यंत उत्कृष्ट आणि आदर्श पद्धतीने साजरा करण्याची परंपरा पुण्याने याही वर्षी जपल्याचे पाहून आनंद वाटला : नामदार चंद्रकांत दादा पाटील (उच्च तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य)
यावेळी दादांच्या सोबत प्रभागातील माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी