May 22, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सोमेश्वरवाडी येथे सचिन दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त 50% सवलतीच्या दरात वस्तू विक्री कॅम्प आयोजन..

सोमेश्वरवाडी :

सोमेश्वरवाडी येथे सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल सरचिटणीस सचिन दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त महिला सक्षमीकरण करण्यासाठी घरातील महत्वाच्या वस्तूंची विक्रीचा कॅम्प सुरू करण्यात आला आहे याचे उद्घाटन संपन्न झाले.

 

या कॅम्प मध्ये 50% सवलतीच्या दरात पिठ गिरण, स्मार्ट टीव्ही, सायकल, वाटर फ़िल्टर व गॅस शेगडी या वस्तू असणार आहे. हा विक्री कॅम्प  10 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2024 पर्यंत भरवण्यात आला आहे. जास्तीत जास्त कुटुंबाने याचा लाभ घ्यावा असे आवाहन सचिन दळवी सोशल फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

या शुभ कार्याचे उद्घाटन शांताराम महाराज आण्णा निम्हण,पांडुरंग आप्पा दातार, पोपटराव जाधव, प्रकाश तात्या बालवाडकर, चिंतामण भाऊ दळवी, धनंजय जाधव, बारीकराव जोरे व ज्ञानेश्वर आरगडे यांच्या हस्ते संपन्न झाले.