नोकरी मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बाणेर :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या नेतृत्वाखाली “राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या” वतीने पुणे शहरातील प्रत्येक विधानसभेत “राष्ट्रवादी युवा नोकरी ” मेळावे आयोजित करत यशस्वी केले यातील शेवटचा मेळावा आज बाणेर येथील धनकुडे फार्म येथे घेण्यात आला.
शहरातील प्रत्येक विधानसभेत नोकरी मेळावे यशस्वी झाल्यानंतर आज माझ्या बाणेर, बालेवाडी , सुस म्हाळुंगे प्रभागासह औंध, पाषाण, सुतारवाडी भागातील युवांसाठी पुणे मनपाचे माजी स्थायी अध्यक्ष बाबुरावजी चांदेरे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाणेर येथे आज मेळावा आयोजित केला. विविध क्षेत्रातील अनेक कंपन्या आजच्या मेळाव्यात सहभागी झाल्या असून जास्तीत जास्त युवकांना नोकरी देण्याचा आमच्या प्रयत्न असणार आहे असे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी सांगितले.
लोककल्याणाचा निर्धार आणि राज्यातील सर्वच घटकांचा सर्वंकष उद्धार करण्याचा ध्यास असलेले आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या यांच्या वाढदिवसाचा निमित्त सादर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना नोकरी मिळवून देत स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे करण्याचे काम आम्ही केले आहे. युवकांना मिळणारी नोकरी त्यांच्या पुढील भविष्याची दिशा ठरविणारे महत्त्वाचे पाऊल असणार आहे. युवा पिढीला दिशा मिळाल्यास कुटुंबाला भक्कम आधार निर्माण होतो. नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना नोकरीची संधी आम्ही उपलब्ध करून दिली आहे : समीर चांदेरे (युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)
“राष्ट्रवादी युवा नोकरी” मेळाव्याच्या माध्यमातून संपूर्ण पुणे शहरातील विधानसभा क्षेत्रातील युवकांना दिशा देण्याचे काम युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या नेतृत्वाखाली झाले असून युवकांना संघटित करत संघटन अधिक मजबूत झाले आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन