बाणेर :
आफ्रिकन – एशियन ग्रामीण विकास संस्था व वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन पुणे आयोजित ” सहकारातून समृद्धी” या विषयाच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत घाना, जॉर्डन, केनिया, मॉरिशस, नामीबिया, झांबिया, श्रीलंका, इस्वातीनी, सिएरा लिऑन या 9 देशांच्या सरकारी सेवेतील 10 प्रतिनिधींनी योगीराज पतसंस्थेला भेट दिली.
याप्रसंगी ज्ञानेश्वर तापकीर यांनी संस्थेची आर्थिक प्रगती कशी झाली तसेच संस्था राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती सांगितली. संस्था करीत असलेल्या चांगल्या कामाची दखल अंतरराष्ट्रीय पातळीवर घेत इतर देशाचे पदाधिकारी संस्थेच्या कामाचा अभ्यास करण्यासाठी आले याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे असेही यावेळी सांगितले.
संस्थेचे तज्ञ संचालक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रविंद्र घाटे यांनी आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थीना संस्थेची माहिती सांगितली तसेच त्यांना आव्हान केले की, ही भेट फक्त व्यावसायिकतेच्या दृष्टीने न ठेवता आपण योगीराज पतसंस्था व आलेल्या सर्व प्रतिनिधींनी कायमस्वरूपी ऋणानुबंध जपावेत.
केनिया च्या सरकार मंत्रालयाच्या वरीष्ठ सहकारी गुंतवणूक अधिकारी पेट्रीशिया साराह किगेन यांनी यावेळी सांगितले की, योगीराज पतसंस्था ही भारत देशात उत्कृष्ट काम करत आहे. आम्ही सर्वांनी या प्रशिक्षण दरम्यान खूप संस्थांना भेटी दिल्या परंतू योगीराज पतसंस्थेत मिळालेले प्रेम आणि मान सन्मान आम्हाला कोठेच मिळाला नाही.
याप्रसंगी वामनीकॉम चे जॉइन्ट प्रोग्राम डायरेक्टर डॉ. डि रवी, रिसर्च ऑफिसर सबा सईद, योगीराज पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके तसेच सर्व स्टाफ उपस्थित होता.
संस्थेचे तज्ञ संचालक रविंद्र घाटे व माजी संचालक अमर लोंढे यांनी आलेल्या सर्वांचे स्वागत केले व आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आलेल्या सर्वांचे आभार संस्थेचे शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे यांनी मानले.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..