July 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे अखिल न्यू बाणेर मित्र मंडळ व साम्राज्य ग्रुप व्यापारी संघटना आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..

बाणेर :

बाणेर येथे अखिल न्यू बाणेर मित्र मंडळ व साम्राज्य ग्रुप व्यापारी संघटना आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विशेष आकर्षण म्हणून बारा फूट उंचीचा विश्वचषक साकारण्यात आला होता. परिसरातील गोविंदा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बाणेर येथील अखिल न्यू बाणेर मित्र मंडळ व साम्राज्य ग्रुप व्यापारी संघटना यांच्याकडून दरवर्षी दहीहंडीचे आयोजन करत आपली संस्कृती जोपासली जाते. या संघटनेचे अध्यक्ष प्रकाश तापकीर हे गेल्या बारा वर्षापासून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करतात. दरवर्षी वेगळ्या प्रकारची प्रतिकृती सादर करून दहिहंडी उभारली जाते. यावर्षी मंडळातील वैभव तापकीर व पंकज तापकीर यांच्या संकल्पनेतून नईम शेख व सोयल शेख यांच्या कलाकुसरीतून बारा फूटांचा विश्वचषक साकारण्यात आला असून हे या दहीहांडीचे प्रमुख आकर्षण होते.

या ठिकाणी चाकण, मावळ, मुंबई, घाटकोपर बारामती या ठिकाणाहून गोविंदा पथके भर पावसात सलामी देत होते.

तर याप्रसंगी खासदार मेधा कुलकर्णी, तंत्र शिक्षण मंत्री आमदार चंद्रकांत पाटील, कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, डॉ सचिन गांधी, अरुण महाराज येवले, सुकलाल महाराज बुचडे, चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोडगी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ आयोजित केला.

श्री संत तुकाराम महाराज पालखी व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पंढरपूर पर्यंत अपघात मुक्त वारीचे नियोजन केल्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्राचे चे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, ट्रॅफिकचे जिल्हा पोलिस अधीक्षक सुभाष निकम यांचा दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने विशेष सत्कार करण्यात आला.

You may have missed