सूस :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेमध्ये कृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी चा उत्सव उत्साहात करण्यात आला. दहीहंडी हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जाणारा एक लोकप्रिय सण आहे, जो भगवान कृष्णाच्या जन्माचे प्रतीक आहे.
नर्सरी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी गोविंदा आला रे आला या गाण्याच्या तालावर हंडी फोडण्याचा मनमुराद आनंद लुटला. चिमुकल्यांनी गोपिका आणि गोविंदाचे वेषभूषा केली होती. सर्व विद्यार्थी एकत्र येऊन मंत्रमुग्ध झाले होते . विद्यार्थ्यांनी मानवी पिरॅमिड करून दहीहंडी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात फोडली उत्साही प्रदर्शन समुदायाच्या भावनेचा आणि विश्वासाचा पुरावा आहे शालेय वातावरणात प्रेम,करुणा आणि धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांना गोपाळकाला करून वाटण्यात आला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर संचालिका सौ. रेखा बांदल तसेच मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाने करण्यात आले . पर्यवेक्षक सचिन खोडके व नेहा माळवदे यांच्या तसेच सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी वर्ग यांच्या मदतीने अत्यंत उत्साहात दहीहंडी चा हा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.

श्रीकृष्णाच्या जन्माचे स्मरण करणारा हा सण विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी यांनी एकत्र येऊन आनंदाने साजरा करुन हंडी फोडताना संगठीत होऊन जसे मटकी फोडतो तसेच कुठलेही कार्य करताना सर्वजण संगठीत राहण्याचा मोलाचा संदेश आज दहिहंडी निमित्त सर्व विद्यार्थ्यांनी दिला.



More Stories
पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट्स मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा!!!
बाणेरमधील ‘स्किनएथिक्स’ने आणले भारतातील पहिले प्रगत तंत्रज्ञान सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावी – डॉ. पल्लवी अहिरे-शेळके
बालेवाडीतील मोझे कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी ‘इन्सिनरेटर मशीन’ कार्यान्वित