बाणेर :
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात दैनंदिन स्वच्छतेची सेवा देणाऱ्या सफाई कामगार महिलांचा पाषाण येथे राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून भाजपच्या उत्तर मंडलच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त फेटे बांधून व साडी वाटप करत सन्मान करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांना या कामगार महिलांनी राखी बांधून औक्षण केले. उपस्थित सर्वांनी या महिला भगिनींना ओवाळणी देऊन त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून व चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावरील ऑकेजन्स हॉल येथे या रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रभाग अध्यक्ष सुभाष भोळ यांनी केले तर भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल सरचिटणीस सचिन दळवी यांनी आभार मानले.
यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, डॉ.संदीप बुटाला, पुणे शहर भाजपा चिटणीस लहू बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर, गणेश कळमकर, राहुल कोकाटे, उमा गाडगीळ, अस्मिता करंदीकर, रोहन कोकाटे, दीपक पवार, उत्तम जाधव, विवेक मेथा, प्रमोद कांबळे, कल्याणी टोकेकर, मीना पारगांवकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..