बालेवाडी :
अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने बालेवाडी हायस्ट्रीट ग्राऊंड येथे काल भव्य दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. आपली संस्कृती जोपासणाऱ्या भव्य दहीहंडी मध्ये गोपाळ भक्तांनी ‘कामाचा माणूस’ ‘फिक्स आमदार’ बॅनर झळकावत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून अमोल बालवडकर यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यादरम्यान पॅरिस ओलंपिक २०२४ मध्ये शूटिंग प्रकारात कास्यपदक पटकावणारे महाराष्ट्राचे सुपुत्र स्वप्नील कुसळे यांचा सत्कार देखील करण्यात आला आणि त्यांना पुढील क्रीडा क्षेत्रातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत भविष्यात देशासाठी गोल्ड मेडल आणावे म्हणून अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून बालेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करत उत्साह वाढविण्यात आला.
यावेळी डि.जे. परफॉर्मन्ससाठी आलेल्या KRATEX A-Y0 आणि SFX and PYRO Effects ने दहीहंडीच्या उत्सवात अधिक भर घातली आणि बालकृष्णाच्या विविध गाण्यांवर थिरकण्यास सर्वांना भाग पाडले.
तसेच विविध गोविंदा पथकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत थरावर थर रचून उपस्थितांची मने जिंकली. या भव्य उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, म्हाळुंगे पंचक्रोशीतील तसेच कोथरूड मतदारसंघ, पुणे शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातून असंख्य बालगोपालांसह गोविंदा पथक आणि नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
बाणेर बालेवाडी येथील गायत्री तांबवेकरची सायकलिंग मध्ये सुवर्ण कामगिरी..
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…