पुणे विद्यापीठ :
विविधरंगी फुलांनी सजवलेली दहीहंडी | विविध गाण्यांचा गजर | हंडी फुटल्यावर केलेला एकच जल्लोष | या उत्साही वातावरणात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल प्रशालेमधील विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा आनंद लुटला.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे, शिक्षक प्रतिनिधी गौरी गोळे, स्नेहा वाघमारे, वैशाली सैंधाणे, स्मिता जाधव, मनोहर निकम, योगेश्वर चव्हाण, संध्या आवेकर, तेजस्विनी निरगुडे, रेश्मा देवकाते, पल्लवी अभंग, रेश्मा पुरी, अपूर्वा आदलिंगे, सुभाष कांबळे,मंदाकिनी काशीद, दीपक अगावणे, चंद्रकांत कुडले उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक विष्णू मोरे व शिक्षक प्रतिनिधी गौरी गोळे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व कृष्णा पूजनाने झाली. शाळेच्या आवारातील दहीहंडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. विद्यार्थ्यांनी सुंदर मनोरा बनवत विविध गाण्यांवर ठेका धरत वातावरणात रंगत आणली. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही उत्साहाने सहभागी झाले. बालगोपालांमध्ये आनंदाचे वातावरण होते. गोविंदा आला रे या गाण्याच्या तालावर बालगोपालांनी दहीहंडी फोडल्यावर एकच जल्लोष करत शैक्षणिक पुस्तक दहीहंडीचा मनमुराद आनंद लुटला.
शैक्षणिक पुस्तक दहीहंडीत शैक्षणिक साहित्य व पुस्तकांची नावे असलेल्या चिठ्ठ्या हंडीमध्ये घालण्यात आलेल्या होत्या. दहीहंडी फुटल्यावर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष करत आनंदाच्या वातावरणात चिठ्ठ्या लुटल्या. चिट्ठी मध्ये जे शैक्षणिक साहित्य होते ते साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आले.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..