बाणेर :
बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे या परीसरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या पूनम विशाल विधाते यांनी औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश धापकेकर यांची भेट घेऊन खड्डे बुजविण्यात यावे म्हणून निवेदन दिले.
या निवेदनात पूनम विधाते यांनी सहाय्यक आयुक्तांच्या निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले की, माझ्या बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे मधील रस्त्यांची खूप खराब झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहतूक हळुवार होऊन ट्रॅफिक प्रमाणात वाढ होऊन नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच महिला भगिनी या खड्ड्यांमुळे गाडीवरून पडतात. नागरिकांसोबत काही दुर्घटना होण्याची शक्यता असल्यामुळे आपण योग्य ती दखल घेत परिसरातील रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवावे.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..