May 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील राहुल बालवडकर यांचा ‘लोकमत अचिव्हर्स ऑफ पुणे २०२४’ सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान..

पुणे :

बालेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांना लोकमत वर्तमानपत्राच्या वतीने सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘लोकमत अचिव्हर्स ऑफ पुणे २०२४’ समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सन्मान करण्यात आला.

 

लोकमतच्या व्यासपीठावर समाजाच्या उन्नतीसाठी कायम प्रयत्नशील असणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बालेवाडी मधील राहूल बालवडकर यांचा सन्मान करण्यात आला.

समाजा प्रति बांधिलकी जपत समाजातील नागरिकांच्या अडीअडचणी दूर करत असताना लोकमत समूहाच्या वतीने माझा सन्मान झाला ही बाब माझ्यासाठी आनंदाची व प्रेरणादायी आहे भविष्यात आणखी जोमाने सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा यामुळे प्राप्त झाली : राहूल बालवडकर(उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)

You may have missed