September 19, 2024

Samrajya Ladha

औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय भरारी पथकामार्फत राडारोडा टाकणारे, उघड्यावर लघवी, थुंकणे अश्या नगरिकांवर व प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करत दंड वसूल…

औंध :

औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय भरारी पथका करिता घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून बोलेरो वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे प्रभागामध्ये रस्त्यावर अस्वच्छता करणारे, मोकळ्या जागेवर राडारोडा टाकणारे, उघड्यावर लघवी, थुंकणे अश्या नगरिकांवर व प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यवसायिक यांचेवर औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय भरारी पथकामार्फत कारवाई करून 138 केसेस रक्कम रु. 3,69,500/- दंड वसुल करण्यात आला.

मा. उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन श्री. संदिप कदम, मा. महापालिका सहा. आयुक्त श्री. गिरीष दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. विजय भोईर, आरोग्य निरीक्षक निखिल निकम, नितीन लोखंडे, शिवाजी गायकवाड, विनायक चोपडे, सुरेंद्र जावळे, सतीश बनसोडे, योगेश जाधव, प्रमोद उकिरडे श्रीमती ज्योती माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.