February 10, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून नौकरी महोत्सवाचे आयोजन..

पुणे :

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे शहराच्या सर्व विधानसभा मतदार संघात नोकरी महोत्सव व शाखा उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम 3 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर चांदेरे यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विभाग अध्यक्ष राकेश कामटे, शहराचे कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, महिला अध्यक्ष गौरी जाधव, कार्याध्यक्ष मनोज बालवडकर आदी उपस्थित होते.

यावेळी चांदेरे म्हणाले की प्रत्येक मतदारसंघात नौकरी मेळावा घेण्यात येणार आहे. अजित पवार यांनी अर्थसंकल्पात युवकांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. अजित पवार यांची प्रेरणा घेऊन युवक काँग्रेस ने पुणे शहरात विविध तालुक्यातून आलेल्या युवकांसाठी नौकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाची माहिती देताना मनोज पाचपुते म्हणाले, शहरात एकुण 10 मेळाव्याचे आयोजन केले आहे. या माध्यमातून 10 हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. या मेळाव्यात पुणे परिसरातील 350 पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार आहे. यामध्ये बजाज, टाटा ग्रूपच्या कंपन्या, आयटी कंपन्या मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा युवक अध्यक्ष उपस्थित होते.