November 22, 2024

Samrajya Ladha

पेरीविंकलचे तारे संगीत क्षेत्रातही चमकले, विद्यार्थ्यानी समुहगान स्पर्धेत मिळविली बक्षिसे..

कोथरुड :

भारत विकास परिषद, कोथरूड, पुणे आयोजित राष्ट्रीय समूह गान स्पर्धेत पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड कॉलेज बावधन मधील विद्यार्थ्यानी संस्कृत तसेच हिंदी भाषेतील समूह गान स्पर्धेत सहभाग घेऊन द्वतीय क्रमांक व संस्कृत भाषेतील गाण्यात तृतीय पटकाविला. समूहगान मध्ये तृतीय क्रमांक पटकावला दिलीप कोटीभास्कर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

या स्पर्धेत सिद्धी पाटील,श्रावणी दांडगे, प्रांजल वैराळे, रागिणी जायभाय, संस्कृती दूर्गे, नक्षत्रा कारले, शौर्य डोंबाळे, श्लोक सर्वगोड यांनी गायनाचे कौशल्य दाखवले, तर त्यांच्या सुरेल गायनाला सार्थक दगडे या विद्यार्थ्यांने आपल्या तबला वादनाने साथ दिली.

विद्यार्थ्याकडून या स्पर्धेची तयारी शाळेतील संगीत शिक्षक अक्षय कबाडे यांनी करून घेतली पेरिविंकलचे अध्यक्ष राजेद्र बांदल यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले, पेरिविंकलच्या संचालिका रेखा बांदल यांनी विद्यार्थ्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.पेरिविंकलच्या मुख्याध्यापक प्रिया लढ्ढा, पर्यवेक्षिका इंदू पाटील व कल्याणी शेळके यांनी उत्तम मार्गदर्शन केले.