बाणेर :
बाणेर- बालेवाडी- सुस- म्हाळुंगे- पाषाण येथील ट्रॅफिक समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने रस्ते खड्डे मुक्त करणे, वॉर्डनची नेमणूक करणे, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे आणि बॅरिकेड बसवणे आदी मागण्यांच्या संदर्भात माजी नगरसेवक अमोल बालवडकर आणि वरील समस्यांनी त्रस्त नागरिक यांच्या वतीने उद्या रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता राधा चौक, बाणेर येथे विराट निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
बाणेर- बालेवाडी- सुस- म्हाळुंगे- पाषाण येथील ट्रॅफिक समस्यांमुळे नागरिकांची फार अडचण होत आहे. त्यातच खराब रस्ते, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा कुचकामी ठरत आहे. या समस्या सोडविल्या जाव्यात म्हणून वारंवार प्रशासनाला विनंती करून देखील त्यांनी काहीच गांभीर्य न दाखविल्याने या निष्क्रिय प्रशासनाला जागे करण्यासाठी नागरीकांना सोबत घेऊन राधा चौक, बाणेर येथे विराट निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. आपण सर्व रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाहि व आपल्या समस्या सोडविल्या जाणार नाहि म्हणून सर्वांनी उद्या या आंदोलनात सहभागी होऊन लढा देऊया : अमोल बालवडकर (माजी नगरसेवक)
More Stories
म्हाळुंगे टीपी स्कीमसाठी अमोल बालवडकर यांचे मुख्यमंत्री यांना निवेदन; प्रलंबित प्रकल्पाला गती देण्याची मागणी..
बाणेर च्या योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचा २९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा….
सुस येथील बेला कासा सोसायटीतील मिळकत कराच्या समस्यांचे अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून निराकरण