September 17, 2024

Samrajya Ladha

सनी निम्हण यांनी आमदार व्हावे पक्ष देखील कोणता? ते त्यांनीच ठरवावे – नाना पटोले

पटोले यांच्याकडून दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या आठवणींना उजाळा

पुणे,ता.३ :

“सनी निम्हण यांनी येणाऱ्या निवडणूकीत आमदार व्हावे, पक्ष देखील कोणता? ते त्यांनीच ठरवावे. तो देखील मोठा माणूस व्हावा,” अशी प्रार्थना महाराष्ट्र प्रदेश कॅाग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांची कुलदैवतेकडे केली. पुण्यातील सुप्रसिध्द ‘सोमेश्वर फाऊंडेशन’ तर्फे आयोजित ‘कार्यसम्राट मोफत महा- आरोग्य शिबीर’ दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमीत्त २२ जुलै पासून विविध टप्पात सुरू करण्यात आले . यातील तीसरा टप्पा म्हणजे, ‘मुख्य शिबीर’ रविवार (ता.४) जुलै , सकाळी ९ वाजल्यापासून शासकीय कृषी महाविद्यालय मैदान, सिंचन नगर, शिवाजीनगर या ठिकाणी होणार आहे. तत्पुर्वी शनिवार (ता.३) सायंकाळी सहा वाजता, महाराष्ट्र प्रदेश कॅाग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर शिबीराची पाहणी करून निम्हण परिवाराचे कौतूक केले.

पटोले पुढे बोलताना म्हणाले,” मैत्री जपणारा, लोकांच्या दुखा:त धाऊन जाणारा, दिलदार मित्र ज्या पध्दतीचा असतो त्या पध्दतीची त्यांची वागणूक, सामुदायिक विवाह सोहळे, लोकांच्या लग्नापासून त्यांच्या शिक्षणापर्यांत मदत करण्याची मानसिकता, दिलदारपणा जो असतो तो दिलदारपणा मी आमचे मित्र विनायक निम्हण यांच्यामध्ये पाहत होतो. त्यांनी पुण्याच्या विकासासाठी ज्या पध्दतीने काम केले त्याची आठवण अजूनही आहे.” दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या आठवणी सांगून पटोले यांनी शिबीराचे कौतूक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मंत्री सुरेश नवले, पुणे शहर कॅाग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीता तिवारी, माजी नगरसेवक अविनाश साळवे , इंटकचे शहर जिल्हा अध्यक्ष बळीराम डोळे, राज अंबिके, अजित दरेकर, मुख्तार शेख यांच्यासह कॅाग्रेसचे कार्याकर्ते उपस्थित होते.
————