December 3, 2024

Samrajya Ladha

सुतारवाडी येथील वेणूताई चव्हाण प्राथमिक विद्यालयात शिवम सुतार यांच्या वतीने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत..

सुतारवाडी :

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील माजी स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांच्या वतीने सुतारवाडी येथील वेणूताई चव्हाण प्राथमिक विद्यालय येथे नविन शैक्षणिक वर्षाची सुरूवात विद्यार्थ्यांचे स्वागत करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तकांचे संच देऊन पुस्तक वाटपाला सुरुवात करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या शाळेचा पहिला दिवस उत्साही आनंदी असावा म्हणून दरवर्षी शाळा सुरू होताना पहिल्या दिवशी आवर्जून उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करत असतो. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेत दूर करण्याचा प्रयत्न करतो. शाळेचे हेच विध्यार्थी उद्याचे भविष्य असून त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे काम मी करत राहील : शिवम सुतार (माजी स्वीकृत नगरसेवक)