August 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे जीवन चाकणकर यांच्या वतीने आयोजित स्वामी समर्थ मंदिर व प्राणप्रतिष्ठेचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा मोठया उत्साहात संपन्न..

बाणेर :

बाणेर येथे जीवन चाकणकर (उपाध्यक्ष पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी)यांच्या वतीने पुण्याई निवास स्थानी स्वामी समर्थ मंदिर व प्राणप्रतिष्ठेचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला. पंचक्रोशीतील आप्तेष्ट, नातेवाईक, सगेसोयरे, मित्र परिवार राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, सांप्रदायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आवर्जुन उपस्थित राहून स्वामी समर्थांचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

यावेळी इंडिया आघाडी चे पुणे लोकसभा उमेदवार रविंद्र धंगेकर आणि महायुतीचे पुणे लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पत्नी माजी नगरसेविका मोनिका मोहोळ यांनी उपस्थित राहून स्वामींचे दर्शन घेऊन नागरीकांना शुभेच्छा दिल्या

स्वामी समर्थांची सेवा करत असताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमारे दीड ते पावणे दोन हजार नागरिकांना स्वामी भक्तांना अन्नप्रसाद वाटप करण्यात आले. तसेच अतिशय सुंदर भक्ती संगीत कार्यक्रम संपन्न झाला. सर्व मान्यवर पाहुण्यांचे सर्व सर्व राजकीय पक्षांचे नेतेमंडळी तसेच वारकरी व गुरूजण वडीलधारी मंडळी बाणेर परीसरातील भजनी मंडळ स्वामी भक्तांचे मित्र परिवार भक्तगणांचे व पत्रकार बंधूंचे समाजातील सर्व स्तरावरील नागरिकांचे मनोमनी आभार आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली :
जीवन चाकणकर(उपाध्यक्ष पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी.