September 17, 2024

Samrajya Ladha

नवजात बालक पैशांकरिता तस्करी करणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद, वाकड पोलिस ठाणे तपास पथकाची कामगिरी..

वाकड :

वाकड परिसरात जगताप डेअरी येथे नवजात बालकाची तस्करी करून खरेदी विक्री करणाऱ्या सहा महिलांना वाकड पोलिस ठाण्यातील पथकाने ताब्यात घेत मोठी कारवाई केली.

वाकड परिसरातील जगताप डेअरी परिसरात काही महिला अर्भकाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वाकड पोलिस पथकातील पोलिस हवालदार वंदू गीरे यांना मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचणेनुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचला. दरम्यान, त्याठिकाणी दोन रिक्षांतून सहा महिला आल्या. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्यातीलच एका महिलेचे सात दिवसांचे अर्भक पाच लाख रुपयांना विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली. त्यानंतर, याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. सईदा  कांबळे (वय ३५,  पुणे), सुप्रिया वाघमारे (वय ३९,  केशवनगर, धनकवडी, पुणे), ललिता गिरीगोसावी (वय ४५, रा. येरवडा), अफ्रिन शेख (वय २५, रा. हडपसर), अमरीन सय्यद (वय ३२, रा लक्ष्मीनगर, येरवडा), आसमा शेख (वय ३०, रा. हडपसर) या आरोपी महिला असून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदर कारवाई वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलीस निरीक्षक गुन्हे विठ्ठल साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक रविकिरण नाळे, सचिन चव्हाण, अनिरुद्ध सावर्डे, बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, सहाय्यक पोलीस फौजदार राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदू गिरे, संदीप गवारी, स्वप्नील खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, दीपक साबळे, प्रतीक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत गिलबिले, रामचंद्र तळपे, विनायक घारगे, अजय फल्ले, सौदागर लामतुरे, स्वप्नील लोखंडे, कौंतेय खराडे, भास्कर भारती, रमेश खेडकर, ज्ञानदेव झेंडे, महिला अंमलदार रेखा धोत्रे, जयश्री वाखारे, ज्योती तूपसुंदर यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण करत आहेत.